Budhwar Upay: बुधवारी या वस्तूंचे दान करणे करिअरसाठी शुभ

Photo of author

By Abhishek Patel

हिंदू धर्मात बुधवार हा दिवस भगवान गणेश आणि दुर्गा देवीची अराधना करण्यासाठी मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपती आणि दुर्गा देवीची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. याच कारणामुळे या दिवसासाठी काही ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहे ज्याने बुध ग्रह मजबूत होण्यासह करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतात. जाणून घ्या बुधवारचे उपाय-

या गोष्टी करा दान : बुधवारी दान करणे करिअरसाठी खूप फायदेशीर मानले जाते. या दिवशी हिरव्या वस्तूंचे दान करावे. तुम्ही गरजूंना मुगाची डाळ, हिरव्या रंगाचे कपडे किंवा विवाहित महिलांना बांगड्या दान करू शकता. असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होते असे मानले जाते.

गणेश वंदना करा : या दिवशी नियमानुसार गणेशाची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी त्यांच्या मंत्रांचा जप करावा. विशेषत: या दिवशी लाभ मिळविण्यासाठी ‘ॐ ग्लौम गणपतयै नमः’ या मंत्राचा जप करावा. गणपतीला मोदक अर्पण करा.

करा हे खास उपाय : बुधवारी एखादा नपुंसक दिसला तर त्याला काही पैसे किंवा मेकअपचे साहित्य दान करा. असे केल्याने पैसा, व्यवसाय, शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात यश मिळते असे मानले जाते.

दुर्गा सप्तशती पाठ करा : या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करणे फलदायी मानले जाते. वेळेची कमतरता असल्यास बारावा अध्याय आणि कुंजीकास्तोत्राचे पठण करावे.

कामात यश: बुधवारी घरातून बाहेर पडताना सिंदूर टिळक लावा. या दिवशी हिरवे कपडे घाला. जर हिरव्या रंगाचे कपडे नसेल तर हिरवा रुमाल किंवा या रंगाचे कोणतेही कापड ठेवा. त्यामुळे काम पूर्ण होण्याची शक्यता वाढते.

संकटांपासून मुक्ती : या दिवशी गाईला घास खाऊ घालणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, वर्षातून एकदा तरी बुधवारी आपल्या वजनाइतके गवत खरेदी करून गोठ्यात दान करावे.

Leave a Comment