IAS full form in Marathi | आय ए एस फुल फॉर्म इन मराठी | IAS म्हणजे काय?

Photo of author

By Abhishek Patel

IAS full form in Marathi:- नमस्कार मित्रानो, आज आपण IAS full form in Marathi या लेखात IAS म्हणजे काय? IAS म्हणजे काय आणि IAS चा मराठी मध्ये फुल फॉर्म काय होतो ते बघणार आहोत. तसेच आपण बघणार आहोत समाजात IAS या पदाची भूमिका काय असते आणि IAS व्यक्ती ती कोणत्या पद्धतीने पार पाडत असतो.

बऱ्याच वेळेस विविध परीक्षामध्ये IAS बद्दल माहिती विचारली जाते. त्यामुळे आपल्या साठी हे माहित करून घेणे अति महत्वाचे असते. जर तुम्हाला IAS चे फुल फॉर्म किंवा IAS शी संबंधित मूलभूत माहिती माहीत नसेल, तर या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला IAS बद्दल सखोल माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर मग आरंभ करूया आणि जाणून घेऊया IAS म्हणजे काय आणि IAS चे पूर्ण रूप काय आहे.

IAS फुल्ल फॉर्म काय आहे? | IAS full form in Marathi

IAS चा फुल फॉर्म आहे (Indian Administrative Service) भारतीय प्रशासकिय सेवा. IAS अधिकारी हे भारतीय समाजात शक्ती आणि प्रतिष्ठेचे पपद मानले जाते. भारतातील सर्व सरकारी यंत्रणांच्या चाव्या IAS अधिकाऱ्यांच्या हातात असतात. आपण बघतो कि मोठमोठ्या शहरात जिल्हाधिकारी हे पद असते ते IAS या सेवेतून आलेले असते. तसेच काही राज्यात IAS (DM) अंतर्गत काम करतात. आयएएस अधिकाऱ्याकडे अमर्यादित अधिकार असतात, ज्यामुळे या पदाची जबाबदारी आणि प्रतिष्ठा आणखी वाढते.

इतक्या मोठ्या जबाबदारीसाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही एक मोठी जबाबदारी आहे, म्हणूनच नागरी सेवा परीक्षा अशा प्रकारे तयार केली गेली आहे की जी केवळ प्रतिभावान उमेदवारच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात.

नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्याची सरासरी फक्त १ लाख उमेदवारांपैकी फक्त १६ -१७ उमेदवार निवडले जातात यावरून आपण समजू शकतो कि या परीक्षेसाठी किती स्पर्धा असते. सामान्य पदवीधरांपासून ते डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञांपर्यंत सर्वजण या परीक्षेत बसतात. म्हणून, या परीक्षेतील निवड खूप कठीण असते. त्यामुळे भारतात नागरी सेवा परीक्षा (CSE) ही आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

IAS फुल्ल फॉर्मभारतीय प्रशासकीय सेवाIndian Administrative Service
UPSC फुल्ल फॉर्मसंघ लोकसेवा आयोगUnion Public Service Commission

IAS परीक्षा पात्रता | IAS Exam Eligibility

  • उमेदवार हा भारतीय नागरिक असणे सर्वात महत्वाचे आहे.
  • उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि जे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले होते आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहे ते उमेदवार देखील पात्र आहेत.
  • IAS परीक्षेला बसण्यासाठी किमान वय २१ वर्षे असणे आवश्यक आहे, तसेच IAS परीक्षेसाठी कमाल वयोमार्याद ही १ ऑगस्ट २०२१ ला निघालेल्या परिपत्राका नुसार पुढील प्रमाणे असेल.
  • सामान्य श्रेणीसाठी (General category) कमाल वयोमर्यादा हि 32 वर्षे आहे.
  • OBC साठी वयोमर्यादा 35 वर्षे.
  • SC/ST साठी उच्च वयोमर्यादा 37 वर्षे.

IAS बद्दल महत्वपूर्ण:

IAS परीक्षा ही भारतातील मुख्य परीक्षा आहे आणि सर्वात कठीण देखील. IAS ही समाजाची सेवा करण्यासाठी सर्वोत्तम अखिल भारतीय सेवा आहे. आपल्या देशातील तरुण आयुष्यात एकदा तरी आयएएस अधिकारी होण्याची इच्छा बाळगत असतात, आणि त्यापैकी बरेच यशस्वी होतात. UPSC द्वारे दरवर्षी हि परीक्षा घेतली जाते. अखिल भारतीय सेवा आणि विविध केंद्रीय नागरी सेवांसाठी दरवर्षी नागरी सेवा परीक्षा (CSE) आयोजित करते.

IAS अधिकाऱ्याचे मुख्य काम काय असते?

IAS अधिकारी यांची कामे त्यांच्या पोस्टिंग आणि विभागनुसार वेगवेगळी असतात. म्हणजेच जिल्हा क्षेत्र, किंवा विभागाचा प्रशासकीय प्रभार, तसेच धोरण तयार करणे त्यानंतर त्या धोरणाची अंमलबाजावणी करणे आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स यांचे प्रमुख इत्यादी कार्यांचा समावेश असतो.

तसेच या अधिकाऱ्याला विविध मिशन वर देखील पाठवले जाऊ शकते, यांना खासगी संस्थांमध्ये देखील नियुक्त करण्याची तरतूद केलेली असते. आय ए एस अधिकारी ही सिविल सर्वंट म्हणून त्याच्या कामांच्या अंतर्गत असलेल्या क्षेत्रातील कायदा तसेच सुव्यवस्था राखण्याचे कार्य करतात.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्याना आरक्षण:

आधीच अस्तित्वात असलेल्या आरक्षण श्रेणी व्यतिरिक्त, या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) श्रेणीची एक नवीन श्रेणी जोडली आहे. जिचा उद्देश भारत सरकारद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना आरक्षण प्रदान करणे हा आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (EWS) उमेदवारांसाठी पात्रता अटी त्याच असून त्या सामान्य उमेदवारांच्या पात्रता अटी सारख्या आहेत.

IAS ला अधिकृतपणे नागरी सेवा परीक्षा (CSE) म्हटले जाते केंद्रीय भरती एजन्सी, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) द्वारे दरवर्षी या परीक्षांचे आयोजन केले जाते.

IAS परीक्षेत निवड:

आयएएस ही सेवा नसून मोठी जबाबदारी आहे. IAS अधिकारी एकापेक्षा जास्त स्तरावरील वेगवेगळ्या विभागातील अधिकार्याच्या प्रयत्नांना योग्य दिशा देण्याचे काम करतात. ते जिल्ह्यात एक प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि प्रत्येकाला चांगले काम करण्याची प्रेरणा देतात.

शहर असो किंवा जिल्हा, मग ते राज्य सरकार असो किंवा भारत सरकार, प्रत्येक विभागाच्या शीर्षस्थानी IAS अधिकारी नेमलेले असतात. दरवर्षी, यूपीएससी फेब्रुवारी महिन्यात नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना प्रस्तुत केली जाते. IAS full form in Marathi ज्यात IAS सोबत सुमारे २४ केंद्रीय नागरी सेवाची जाहिराती प्रदर्शित केली जाते.

भारतात IAS – भारतीय प्रशासकीय सेवा, IPS – भारतीय पोलीस सेवा आणि IFS – भारतीय वन सेवा यांना अखिल भारतीय सेवा म्हणून अधिसूचित केले आहे. तसेच उर्वरित सेवा पण केंद्रीय नागरी सेवांमध्येच येतात.

IAS परीक्षेसाठी पात्रतेचे निकष: IAS Information in Marathi

अश्या प्रकारे आपण सदर लेखामध्ये IAS फुल्ल फॉर्म, IAS म्हणजे काय? आणि इतरही IAS बद्दल सविस्तर माहिती मराठी मधून जाणून घेतली आहे. तरी तुम्हाला वरील लेखाबद्दल काही प्रश्न किंवा आणखी माहिती हवी असल्यास नक्की कंमेंट करा. आणि त्याचप्रमाणे सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना हा लेख शेअर करा.

IAS शैक्षणिक पात्रता:

या परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीसाठी किमान टक्केवारीची अट नाही. केवळ आवश्यक अट अशी आहे की पदवी सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली असावी. IAS full form in Marathi परीक्षेची रचना अशी केली गेली आहे की वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील व्यक्तींना वेगवेगळ्या श्रेणीत बसवले जाते. ज्या उमेदवारांना पदवी अभ्यासक्रमामध्ये चांगले गुण आहेत, त्यांना कोणताही फायदा नाही, फक्त ते या साठी उतीर्ण असणे आवशक आहे.

जे उमेदवार त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात आहेत असे उमेदवार त्या कालावधीत पदवी पूर्ण करतील या अटीच्या अधीन राहून अर्ज करू शकतात.

Faq

IAS परीक्षा कितीदा देता येते?

IAS हि परीक्षा OBC साठी वयाच्या ३५ वर्षापर्यंत ९ वेळा देता येते, General Category साठी वयाच्या 32 वर्षापर्यंत 6 वेळा देता येते आणि SC/ST उमेदवारांना वयाच्या 37 वर्षेपर्यंत आणि कितीही वेळा हि परीक्षा देता येते.

IAS परीक्षेद्वारे कोणकोणत्या पदांवर नियुक्ती होते?

IAS परीक्षा पास केल्या नंतर IAS अधिकाऱ्याला वेग-वेगळ्या पदांवर नियुक्त केले जाऊ शकते ते पदे पुढील प्रमाणे आहेत.

IAS परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?

IAS अधिकारी होण्यासाठी संघ लोकसेवा आयोग या द्वारे परीक्षा आयोजित केल्या जातात. आणि त्याची निवड प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये होते ते पुढीलप्रमाणे पाहूया.

अश्या प्रकारे वरील दिलेल्या तीन टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात, हीच IAS परीक्षेसाठीची निवड प्रक्रिया असते.

धन्यवाद! 😎 😎

Leave a Comment